पंतप्रधान कार्यालय

फ्रांसच्या शातूह इथे सुरु असलेल्या पॅरा नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मनीष नरवाल आणि रुबिना फ्रान्सिस चे केले अभिनंदन

Posted On: 08 JUN 2022 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जून 2022

 

फ्रांसच्या शातूह इथे सुरु असलेल्या पॅरा नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल  पंतप्रधानांनी मनीष नरवाल आणि रुबिना फ्रान्सिस चे अभिनंदन केले आहे.

“#Chateauroux2022 इथे सुरु असलेल्या स्पर्धेत, 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक जिंकलेल्या, मनीष नरवाल आणि रुबिना फ्रान्सिस यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

या विशेष विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन ! भविष्यातील त्यांच्या सर्व प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा !”

असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.  

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832402) Visitor Counter : 121