पंतप्रधान कार्यालय

जागतिक पॅरा शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल श्रीहर्षा देवराड्डीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 08 JUN 2022 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज श्रीहर्षा देवराड्डीचे जागतिक पॅरा शुटिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की;

"सुवर्णपदक जिंकल्याबद्दल श्रीहर्षा देवराड्डीचा मला अभिमान वाटतो. त्यांचा निर्धार हा खर्या अर्थाने प्रेरित करणारा आहे. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत."

 

* * *

S.Patil /U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832084) Visitor Counter : 166