पंतप्रधान कार्यालय
लडाखमध्ये बस अपघातात भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
Posted On:
27 MAY 2022 7:31PM by PIB Mumbai
लडाखमध्ये बस अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
"लडाखमध्ये झालेल्या बस अपघाताच्या घटनेनं मी अत्यंत व्यथित झालो. या अपघातात आपण लष्कराचे शूर जवान गमावले. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेले जवान लवकरच बरे होवोत अशी आपली प्रार्थना आहे. बाधितांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे" असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828829)
Visitor Counter : 176
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada