पंतप्रधान कार्यालय
कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह मदत जाहीर
Posted On:
24 MAY 2022 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना 50,000 रुपये सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे;
"कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत: PM @narendramodi"
"हुबळीतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM @narendramodi"
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828029)
अभ्यागत कक्ष : 252
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam