आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

म्हैसूरू येथे 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन : योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे पंतप्रधान करणार नेतृत्व

Posted On: 23 MAY 2022 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2022

8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनी  (आयडीवाय-2022) योग प्रात्यक्षिकांचा मुख्‍य कार्यक्रम 21 जून 2022 रोजी कर्नाटकमधल्या म्हैसूरू येथे होणार आहे. आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज जाहीर केले की, यंदाच्या वर्षी सार्व‍जनिक योग प्रात्यक्षिकाच्या  मुख्‍य कार्यक्रमासाठी म्हैसूरू हे स्थान निवडण्‍यात आले आहे.

 

यंदाचा आयडीवाय कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातला आहे; त्‍यामुळे मंत्रालयाने देशभरातल्या 75 प्रतिष्ठित स्‍थानांवरून  आयडीवाय पाहण्‍यासाठी सुविधा करण्‍याची योजना आखली आहे. तसेच जागतिक स्‍तरावर भारताचे ब्रँडिंग करण्‍यावर लक्ष केंद्रीत करण्‍यात आले आहे.

या कार्यक्रमाविषयी पत्रकारांना माहिती देताना सर्वानंद सोनोवाल म्हणाले, दि. 21 जून रोजी म्हैसूरू येथील मुख्‍य कार्यक्रमाशिवाय आणखी एक आकर्षण म्हणजे गार्डियन रिंग, रिले योग, कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. परदेशातल्या भारतीय मिशन्सव्दारे आयोजित आयडीवाय कार्यक्रमांचे ‘डिजिटल फीड कॅप्चर’  करण्यात येणार आहे.  उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या जपानमधून कार्यक्रम ‘स्ट्रिमिंग’ करण्‍याची योजना प्रस्तावित आहे.  स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.00 वाजता या मुख्‍य कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.

आयडीवायपर्यंत कार्यक्रमांची मालिकाच आयोजित  करण्‍याचे नियोजन असल्याचे मंत्री सोनोवाल यांनी सांगितले. यामध्‍ये 27 मे रोजी हैद्राबाद येथे 25 दिवसांच्या   उलटगणतीचा  कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. यामध्‍ये सुमारे 10 हजार योगप्रेमी सहभागी होणार असून ते योग प्रात्यक्षिके करतील.

या कार्यक्रमाला कर्नाटकाचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, चित्रपट क्षेत्रातले तारे-तारका, लोकप्रिय कलाकार, क्रीडापटू, योगगुरू, नामवंत मान्यवर, योग आणि संबंधित शास्त्रातले तज्ज्ञ, स्‍थानिक योग संस्‍था आणि योगप्रेमी सहभागी होणर आहेत.

याआधी भव्य उलटगणती ( मेगा काउंटडाउन) कार्यक्रम शिवडोल येथे ( दि. 2 मे रोजी 50 व्या दिवसापासूनची उलटगणती) आणि लाल किल्ला (दि. 7 एप्रिल रोजी 75 व्या दिवसापासूनची उलटगणती) येथे आयोजित करण्‍यात आले होते.

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827768) Visitor Counter : 206