पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फास्ट रिटेलिंग कंपनीचे अध्‍यक्ष तादाशी यनाई यांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 23 MAY 2022 12:14PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 23 मे 2022 रोजी टोकियो येथे युनिक्लोची पालक कंपनी, फास्ट रिटेलिंग कंपनीचे अध्‍यक्ष आणि मुख्य  कार्यकारी अधिकारी तादाशी यनाई यांची भेट घेतली. याप्रसंगी भारतामध्‍ये वेगाने वाढणा-या वस्‍त्रोद्योग आणि वस्त्र प्रावरणे क्षेत्र आणि यामध्ये उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना राबविण्‍यासाठी असलेल्या गुंतवणूक संधींविषयी चर्चा केली. भारतामध्‍ये परदेशी  गुंतवणूकदारांना सुलभतेने व्यवसाय करण्‍यासाठी औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा, करआकारणी आणि कामगार या क्षेत्रांसह  सरकारने हाती घेतलेल्या  विविध सुधारणांवरही त्यांनी चर्चा केली.

वस्त्रोद्योग निर्मिती केंद्र बनण्‍याच्या विशेषकरून  वस्त्रोद्योग उत्पादनात तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या भारताच्या प्रवासामध्‍ये युनिक्लोने व्यापक सहभाग देण्‍यासाठी पंतप्रधानांनी आमंत्रित केले.वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक बळकटी आणण्यासाठीच्या पीएम-मित्र योजनेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी युनिक्लोला आमंत्रित केले.

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

NC/SB/DY

 


(रिलीज़ आईडी: 1827602) आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam