पंतप्रधान कार्यालय
दिल्लीत लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदतीची घोषणा
Posted On:
13 MAY 2022 11:50PM by PIB Mumbai
दिल्लीत भीषण आग लागल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या निकटच्या वारसाला 2 लाख रुपये, तर आगीत जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) ही मदत दिली जाणार आहे.
"दिल्लीत लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या जीवितहानीचं वृत्त ऐकून आपल्याला तीव्र दु:ख झालं. या आगीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या आगीत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे होवोत हीच माझी कामना आहे." असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
दिल्लीतील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या निकटच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून दिली आहे.
***
S.Tupe/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825346)
अभ्यागत कक्ष : 225
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam