पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 13 मे रोजी मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ करणार
Posted On:
12 MAY 2022 2:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2022
इंदूर येथे 13 मे 2022 रोजी आयोजित मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ करतील आणि स्टार्टअप समुदायाला संबोधित करतील. मध्य प्रदेश स्टार्टअप पोर्टलचे देखील ते उद्घाटन करतील. यामुळे स्टार्टअप परिसंस्थेला प्रोत्साहन आणि मदत मिळेल.
मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये स्टार्टअप परिसंस्थेच्या विविध घटकांचा सहभाग असेल, ज्यामध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील धोरणकर्ते, नवोन्मेषक, उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि इतर हितधारकांचा समावेश असेल. यात स्पीड मेंटॉरिंग सत्रासह विविध सत्रे होतील, ज्यात स्टार्टअप्स शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप क्षेत्रातील प्रमुखांशी संवाद साधतील; स्टार्टअप सत्र कसे सुरू करावे, ज्यात स्टार्टअप्सना धोरणकर्ते मार्गदर्शन करतील; निधी पुरवठा संबंधित सत्र, ज्यात उद्योजकांना विविध निधी पद्धतींबद्दल जाणून घेता येईल; पिचिंग सत्र, ज्यात स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांबरोबर सहकार्य करण्याची आणि निधी मिळवण्यासाठी आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल; आणि इकोसिस्टम सपोर्ट सत्र, ज्यात सहभागी झालेल्यांना ब्रँड व्हॅल्यू आणि राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेला चालना देण्याबद्दल शिकायला मिळेल. नवीन कल आणि नाविन्यपूर्ण संशोधन याबाबत माहिती देणाऱ्या स्टार्टअप एक्स्पोचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824709)
Read this release in:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada