पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 6 मे रोजी 'जेआयटीओ कनेक्ट 2022'च्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2022 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेच्या 'जेआयटीओ कनेक्ट 2022' या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.
जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था (जेआयटीओ) ही जगभरातील जैनांना जोडणारी जागतिक संस्था आहे.म्युच्युअल नेटवर्किंग आणि वैयक्तिक परस्परसंवादासाठी एक सुविधा प्रदान करणारा .जेआयटीओ कनेक्ट हा व्यवसाय आणि उद्योगांना मदत करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. 'जेआयटीओ कनेक्ट 2022' हा तीन दिवसीय कार्यक्रम पुण्यातील गंगाधाम अॅनेक्स येथे 6 ते 8 मे दरम्यान आयोजित करण्यात आला असून व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवरील अनेक सत्रांचा यात समावेश असेल.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1823061)
आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam