पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान आणि फ्रान्सचे अध्यक्ष यांच्या भेटीबाबतचे प्रसिद्धी पत्रक
Posted On:
04 MAY 2022 8:03AM by PIB Mumbai
कोपनहेगनमधील दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेहून परतताना 4 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचा अधिकृत दौरा केला.
2. पॅरिसमध्ये पंतप्रधानांनी फ्रान्सचे अध्यक्ष महामहिम इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर आणि प्रतिनिधी स्तरावरही भेट घेतली. संरक्षण सहकार्य, अंतराळ, नील अर्थव्यवस्था, नागरी आण्विक मुद्दे आणि नागरीकांचे परस्पर संबंध यासह अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर उभय नेत्यांनी चर्चा केली.
3. प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टिकोनाचा उभयतांनी आढावा घेतला आणि भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी जागतिक हितासाठी एक शक्ती बनवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या उपायांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्याने केवळ दोन्ही देशांमधीलच नव्हे तर दोन्ही नेत्यांमधील दृढ मैत्री आणि सद्भावना दिसून आली.
4. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना लवकरात लवकर भारत भेटीवर यावे साठी आमंत्रित केले.
5. इथे पाहू शकत असलेले संयुक्त निवेदन दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर जारी करण्यात आले.
***
JPS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822921)
Visitor Counter : 133
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam