पंतप्रधान कार्यालय
ब्राझीलमध्ये आयोजित डेफलिम्पिक 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 MAY 2022 7:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील मध्ये आयोजित डेफलिम्पिक 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या क्रीडास्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघण्यापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला खेळाडूंनी दिलेली भेट मनाला खरोखरच स्पर्श करून गेली,असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“आजपासून सुरू होणाऱ्या डेफलिम्पिक 2021 मध्ये सहभागी होत असलेल्या आपल्या चमूला भारत प्रोत्साहित करत आहे. आपल्या सर्व प्रतिभावान खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा.
क्रीडास्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघण्यापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला खेळाडूंनी दिलेली भेट खरोखरच मनाला स्पर्शून गेली. "
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821875)
अभ्यागत कक्ष : 202
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam