शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यासंबंधी (NCF) अधिकृत ‘निर्देशपत्र’ धमेंद्र प्रधान प्रका‍शित करणार

Posted On: 28 APR 2022 4:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2022

 

केंद्रीय शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या (NCF) आराखड्याचे अधिकृत ‘निर्देशपत्र’ म्हणजेच सूचनापत्र  दिनांक 29 एप्रिल, 2022 रोजी जाहीर करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020(NEP) या सूचनापत्राच्या माध्‍यमातून  शालेय शिक्षण, बालक सेवा आणि शिक्षण (ECCE), शिक्षकांचे  प्रशिक्षण आणि प्रौढ शिक्षण,या चार क्षेत्रांतील राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) विकसित करण्याची शिफारस केली आहे.

या प्रसंगी कर्नाटकचे  उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथनारायण सी. एन; कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री, डॉ.बी. सी. नागेश, राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा राष्ट्रीय सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ .के. कस्तुरीरंगन, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिव अनिता करवाल आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परीषद (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT) चे संचालक प्राध्यापक डी.पी. सकलानी  उपस्थित राहणार आहेत.

या चार अभ्यासक्रमांच्या चौकटीच्या विकासासाठी निर्दिष्ट प्रक्रिया प्रदान करण्यासाठी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020(NEP) च्या उद्दिष्टांवर आधारित; 1.अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र 2. क्रॉस-कटिंग इश्यूज- महत्वपूर्ण मुद्दे  3. एनईपी 2020 मधील महत्वपूर्ण क्षेत्रांच्या अंतर्गत येणारे विषय, या तीन श्रेणींमध्ये कार्यक्षेत्र प्रणालीमध्‍ये  बदल आणि इतर सुधारणांवर महत्त्वपूर्ण आणि लक्ष केंद्रित करणाऱ्या 25 विविध संकल्पना मांडल्या गेल्या.

या अधिकृत निर्देशपत्रामध्‍ये  एनसीएफच्या विकास प्रक्रियेचे, त्यासंबंधी अपेक्षित रचनेचे आणि उद्दिष्टांचे आणि एनईपी 2020 मधील काही मूलभूत तत्त्वांचे वर्णन केलेले आहे, जे एनसीएफच्या विकासाची माहिती देतील.  एनसीएफचा मसुदा जिल्हा ते राज्य स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सहयोगी आणि सल्लागार प्रक्रियेद्वारे तयार केला जात आहे.‘ नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क’ च्या विकासासाठी विविध स्तरांवरील   मार्गदर्शक तत्त्वे’ हा या निर्देशपत्राचा अविभाज्य घटक आहे.

शाळा/जिल्हा/राज्य स्तरावर विस्तृत सल्लामसलत करून अभ्यासक्रमाच्या चौकटीची संपूर्ण प्रक्रिया कागद न वापरता संगणकीय मंच  आणि मोबाईल ॲपच्या मदतीने  तांत्रिक सहाय्याने केली जात आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820939) Visitor Counter : 613