मंत्रिमंडळ

दिव्यांग क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि चिली यांच्यातील सामंजस्य करारावरील स्वाक्षरीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 27 APR 2022 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि चिली दरम्यान दिव्यांग क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करारावरील  स्वाक्षरीला  मान्यता दिली आहे.

हा द्विपक्षीय सामंजस्य करार केंद्र सरकारचा दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि चिली सरकार यांच्यातील दिव्यांग क्षेत्रातील संयुक्त उपक्रमांद्वारे सहकार्यास प्रोत्साहन देईल. यामुळे भारत आणि चिली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

दिव्यांग क्षेत्रात विशेषत: खालील क्षेत्रात सहकार्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या देशांदरम्यान संयुक्त आशय पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली:

  1. दिव्यांग धोरण आणि सेवांच्या वितरणावरील माहितीची देवाणघेवाण.
  2. माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण.
  3. सहाय्यक उपकरण तंत्रज्ञानामध्ये सहकार्य.
  4. दिव्यांग  क्षेत्रातील परस्पर हिताच्या प्रकल्पांचा विकास.
  5. दिव्यांग असल्याची लवकर ओळख आणि प्रतिबंध.
  6. तज्ञ, शिक्षणतज्ञ आणि इतर प्रशासकीय कर्मचारी यांची देवाणघेवाण.

हा सामंजस्य करार त्या अंतर्गत असलेल्या उपक्रमांच्या खर्चासाठी निधीची यंत्रणा प्रदान करतो . निधी आणि संसाधनांच्या उपलब्धतेच्या अधीन राहून अशा उपक्रमांसाठीचा खर्च प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर दोन्ही सरकार परस्पर ठरवेल. संयुक्त उपक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास/निवासाच्या खर्चाची  तरतूद भेट देणार्‍या देशाकडून केली जाईल, तर संमेलन आयोजित करण्याचा खर्च यजमान देश उचलेल.

भारत चिली संबंध हे विविध मुद्द्यांवरील समान मतांवर आधारित घनिष्ट आणि मैत्रीपूर्ण आहेत. 2019-20 हे वर्ष उभय देशांमधील राजनैतिक संबंधांचे 70 वे वर्ष होते , उच्च-स्तरीय भेटींच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत, ज्यात 2005 आणि 2009 मध्ये चिलीच्या माननीय राष्ट्राध्यक्षांच्या दोन भेटींचा समावेश आहे.

 

* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820631) Visitor Counter : 196