पंतप्रधान कार्यालय
राजस्थानातील झुन्झुनु येथील दुर्दैवी अपघातामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत देण्याची घोषणा
प्रविष्टि तिथि:
19 APR 2022 7:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील झुन्झुनु येथील अपघाताच्या दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे;
“झुन्झुनु येथील दुर्दैवी अपघातामुळे व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये देण्यात येतील तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल: पंतप्रधान @narendramodi”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1818199)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam