पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 18 APR 2022 2:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022

लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

देशभरात शौचालयांची उभारणी असो, कचऱ्याची विल्हेवाट लावणे असो, ऐतिहासिक वारशाचे जतन असो किंवा स्वच्छताविषयक स्पर्धा असो, या सर्वांच्या माध्यमातून देश आज स्वच्छतेच्या क्षेत्रात नवे अध्याय लिहित आहे असे ते म्हणाले.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

लोकसहभागामुळे एखाद्या देशाच्या विकासाला कशा प्रकारे नवी उर्जा मिळते याचे स्वच्छ भारत अभियान हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. शौचालयांची उभारणी असो किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणे असो, ऐतिहासिक वारशाचे जतन असो किंवा स्वच्छताविषयक स्पर्धा असो, आज देश स्वच्छतेच्या बाबतीत नवनव्या कथा लिहित आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1817734) आगंतुक पटल : 284
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam