आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषाणूच्या एक्सई या नव्या प्रकाराबाबत तज्ञ व्यक्ती आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन
या नव्या प्रकारच्या विषाणूच्या प्रसारावर लक्ष ठेवण्याच्या आणि यामुळे बाधित रुग्णांची देखरेख करण्याच्या सध्या सुरु असलेल्या कार्याला अधिक चालना देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या
Posted On:
12 APR 2022 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 या विषाणूच्या एक्सई या उत्परिवर्तित प्रकाराबाबत चर्चा करण्यासाठी देशातील या क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या तज्ञ व्यक्ती आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. देशात सध्या कोविड-19 संसर्गाने बाधित रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, केंद्रीय मंत्र्यांनी कोविडच्या या नव्या प्रकारावर लक्ष ठेवण्याच्या आणि कोरोना बाधित रुग्णांवर देखरेख ठेवण्याच्या सध्या सुरु असलेल्या कार्याला अधिक चालना देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि साधन संपत्ती या घटकांबाबत बोलताना केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय यांनी कोविडवरील उपचारासाठी लागणारी अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा सतत आढावा घेण्याचे निर्देश बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले. सध्या सुरु असलेली लसीकरण मोहीम अधिक वेगाने कार्यरत करावी आणि सर्व लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात याव्यात यावर त्यांनी यावेळी अधिक भर दिला.
नीती आयोगाच्या वैद्यकीय विभागाचे सदस्य डॉ.व्हि.के.पॉल, आरोग्य सचिव राजेश भूषण, एम्सचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया, आयसीएमआरचे महासंचालक डॉ.बलराम भार्गव, एनटीएजीआय या गटाचे डॉ.एन.के. अरोरा यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816013)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam