पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गुजरातमधील भरूच येथील कारखान्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक


प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून आर्थिक मदत केली जाहीर

Posted On: 11 APR 2022 2:11PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भरूच येथील कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृताच्या आप्तांना 2 लाख आणि या घटनेत जखमी झालेल्यांना 50,000 रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून आर्थिक मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट संदेशात म्हटले आहे;

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरूचमधील एका कारखान्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.

मृतांच्या आप्तांना पीएमएनआरएफ (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील तर जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदत केली जाईल."

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815636) अभ्यागत कक्ष : 222