युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धांसाठी खेळाडूंच्या प्रशिक्षणावर क्रीडा मंत्रालय 190 कोटी रुपये खर्च करणार, भारतीय संघांची निवड सहजतेने करण्यासाठी एन एस एफ च्या मान्यतांमध्ये सुधारणा

Posted On: 04 APR 2022 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2022

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने देशातील तेहतीस क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी वार्षिक वेळापत्रक (एसीटीसी) निश्चित  केले आहे आणि 2022-23 या वर्षासाठी विविध राष्ट्रीय क्रीडा महासंघ (एनएसएफ) यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी 259 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी सर्वाधिक 190 कोटी रुपये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 साठी खेळाडूंचे प्रशिक्षण, त्यांना परदेशातील वातावरणाचा अनुभव देणे, सामग्री आणि सपोर्ट स्टाफ यावर खर्च करण्यात येणार आहे. 2022-23 मध्ये होणाऱ्या स्पर्धा आणि प्रशिक्षण यांचे नियोजित वेळापत्रक यांवर 33 एनएसएफशी सविस्तर चर्चा करून  आणि आगामी काळात ऑगस्ट महिन्यात युकेमध्ये बर्मिंगहॅम इथं होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि चीनमध्ये ग्वांगझू येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या गरजा विचारात घेऊन हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना जास्तीत जास्त पाठबळ उपलब्ध व्हावे यासाठी मंत्रालयाने विविध एन एस एफ सोबत अतिशय बारकाईने विचार विनिमय केला आहे आणि त्यांनी दिलेला प्रत्येक प्रस्ताव मंजूर केला आहे. या तेहतीस महासंघांव्यतिरिक्त मंत्रालयाकडून ज्यांचे वार्षिक स्पर्धा आणि प्रशिक्षण वेळापत्रक( ए सी टी सी) आधीच मंजूर करण्यात आले आहे अशा तीन एनएसएफ सोबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक प्रस्तावित आहे आणि त्यांचे अंदाजपत्रक देखील लवकरच अंतिम करण्यात येईल. 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री  अनुराग ठाकूर म्हणाले की 2022-23 या वर्षात होणाऱ्या स्पर्धा आणि प्रशिक्षणासंदर्भात एनएसएफनी दिलेल्या प्रस्तावांची आणि विशेष करून आगामी काळातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022, आशियायी क्रीडा स्पर्धा 2022 आणि पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धा 2022 यांची   सरकारने दखल घेतली आहे आणि वार्षिक वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. या स्पर्धांसाठी निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता भासू दिली जाणार नाही आणि क्रीडा मंत्रालय खेळाडू आणि एन एस एफ ना आवश्यक ती सर्व मदत आणि पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 2022-23 साठी ए सी टी सी अंतर्गत एन एस एफ ना सुधारित निकषांच्या आधारे 1 मार्च 2022 च्या सुधारित निकषांनुसार निधीचा पुरवठा करण्यात आला आहे. खेळांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन या योजनेतील विविध घटकांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

 

* * *

S.Kakade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1813379) अभ्यागत कक्ष : 811