आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रुग्णवाहिकांना दाखवला हिरवा झेंडा
प्रविष्टि तिथि:
04 APR 2022 12:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज निर्माण भवन, नवी दिल्ली येथे 33 रुग्णवाहिकांना (13 प्रगत जीवन सहाय्यक रुग्णवाहिका आणि 20 प्राथमिक सहाय्यक रुग्णवाहिका) हिरवा झेंडा दाखवला. यावेळी केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांचीही उपस्थिती होती.

केंद्रीय मंत्र्यांना या रुग्णवाहिकांमधून दिल्या जाणाऱ्या आवश्यक सुविधा आणि सेवांची माहिती यावेळी देण्यात आली.

भारतात कोविड उपचारासाठी वितरीत झालेल्या निधी अंतर्गत, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटीज (IFRC) यांनी एएलएस रुग्णवाहिका (ALS), बीएलएस (BLS) रुग्णवाहिका, मोबाईल हेल्थ युनिट्स आणि रक्त संकलन करणाऱ्या फिरत्या वाहनांसाठी काही निधी राखून ठेवला आहे. 33 रुग्णवाहिका या वैद्यकीय वाहनांच्या पहिल्या टप्प्यातील कार्याचा भाग आहेत; ज्या भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या (IRCS) शाखांच्या वतीने आरोग्य आणि आपत्ती प्रतिसाद क्षमता सुधारण्यासाठी पाठवल्या जात आहेत.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीने(IRCS) ने कोविड-19 विरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि महामारीच्या रोगाचा प्रभाव कमी करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी देशभर रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अनेक शिबिरे घेतली आहेत. विस्तृत श्रेणीसह बहुआयामी कार्यांसाठी त्वरीत प्रतिसाद हा संस्था म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या(IRCS) क्षमतेचे स्वरूप आहे.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1813094)
आगंतुक पटल : 273