पंतप्रधान कार्यालय
राज्यसभा सदस्यांना निरोप देताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
31 MAR 2022 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2022
आदरणीय सभापती जी,
तुम्ही वक्त्यांसाठी अनेक मर्यादा घालून दिल्या आहेत. त्या मर्यादांचे पालन करत माझ्या भावना व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न राहील.तसे तर आपल्या इथे निरोप समारंभ असतोच, काही सहकारी इथून जात आहेत, मात्र बंगालीमध्ये जसे म्हणतात आमे आशचि,गुजरातीत म्हणतात आऊजो, पुन्हा या. त्यामुळे सभापती जी यांनी सांगितल्याप्रमाणे किती - किती अनुभव यांच्या सोबत जोडलेले आहेत पाच वेळा चार वेळा , तीन वेळा सदस्य राहिलेल्या इतक्या काळापासूनचे …म्हणजे आपल्या या सर्व महान लोकांच्या गाठीशी खूप मोठा अनुभव आहे. आणि कधीकधी ज्ञानापेक्षा जास्त सामर्थ्य अनुभवाचे असते.
कधीकधी शैक्षणिक ज्ञानाला अनेक मर्यादा असतात,ते ज्ञान चर्चासत्रांमध्ये कामी येते मात्र अनुभवातून जे काही प्राप्त होते यात समस्या सोडवण्यासाठी सोपे उपाय असतात. त्यात नावीन्यतेसाठी अनुभवाचे मिश्रण असल्यामुळे चुका कमीत कमी होतात. आणि याच अर्थाने अनुभवाला स्वतःचे मोठे महत्त्व आहे.आणि जेव्हा असे अनुभवी सहकारी सभागृहातून जातात तेव्हा सभागृहाला , देशाला मोठी कमतरता भासते. येणाऱ्या पिढ्यांसाठी जे निर्णय होणार आहेत, त्यात काहीतरी उणीव राहून जाते. आणि म्हणून अनुभवी लोक जेव्हा सभागृहातून जातात ,तेव्हा त्यांच्याबाबत इथे बरेच काही सांगण्यासारखे आहे.पण जेव्हा अनुभवी लोक इथे नसतात, तेव्हा त्यांची जबाबदारी जरा अधिकच वाढते.जे अनुभवाच्या गाथा इथे सोडून गेले आहेत , त्या गाथा जे इथे सभागृहात आहेत , त्यांना त्या पुढे घेऊन जायच्या आहेत. आणि या गाथा जेव्हा पुढे नेल्या जातील तेव्हा सभागृहाचे सामर्थ्य कधीच कमी होणार नाही. आणि मला विश्वास आहे की, आज निरोप घेणाऱ्या सहकाऱ्यांकडून आपण सर्व जे काही शिकलो आहे, त्यानुसार आज आपण असाही संकल्प केला पाहिजे की, त्यातही जे उत्तम आहे, जे श्रेष्ठ आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सदनाच्या या पवित्र स्थानाचा उपयोग आपण निश्चितपणे करू. आणि हे देशाच्या समृद्धीसाठी अत्यंत कामी येईल.
या चार भिंतींच्या आतमध्ये आपण बराच वेळ घालवतो.भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील भावनांचे प्रतिबिंब, अभिव्यक्ती, वेदना , आनंद सर्व काही येथे प्रवाहित होते. आणि तो प्रवाह आपणही अनुभवत राहतो.कधी-कधी आपण विचार करतो की मी सदनामध्ये खूप काही योगदान दिले आहे, हे खरे आहे, पण त्याचबरोबर या सदनानेही आपल्या आयुष्यात खूप योगदान दिले आहे.आपण सदनाला जे काही देऊन जातो, त्यापेक्षा अधिक आपण सदनातून घेऊन जात असतो, कारण भारतातील वैविध्यपूर्ण सामाजिक व्यवस्थेतून, अनेक चढ-उतारांमधून निर्माण झालेल्या गोष्टी, ज्याचा अनुभव आपण दररोज सदनात घेत असतो.
आणि म्हणूनच आज मी म्हणेन की, आपण या चार भिंतींमधून बाहेर पडत असलो तरी,देशहितासाठी इथून मिळालेल्या अनुभवाला चहूकडे घेऊन जा, चार भिंतीच्या आत जे प्राप्त झाले ते चहुदिशांना घेऊन जाण्याचा आपल्या सर्वांचा संकल्प असावा आणि आणि हादेखील आपला प्रयत्न असायला हवा की, आपण आपल्या काळात सभागृहात ज्या महत्त्वाच्या गोष्टींचे योगदान दिले, ज्यांनी देशाला आकार दिला, देशाची दिशा बदलली, मला वाटते त्या आठवणी कुठेतरी लिहून शब्दबद्ध करा ,कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे भावी पिढ्यांना कधी ना कधी संदर्भ म्हणून ते उपयोगी पडेल.
आपण कुठेही, इकडे किंवा तिकडे बसलो असलो तरी प्रत्येकाने आपापल्या परीने काहीतरी योगदान दिलेले आहे ज्याने देशाला दिशा देण्यात मोठी भूमिका बजावली असेल.याला आपण जर संग्रहित केले तर मला वाटते की आपल्याजवळ इतका मौल्यवान खजिना असेल जो येणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल.म्हणजेच संस्थात्मक व्यवस्थेच्या हितासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.
याचप्रमाणे मला हे देखील वाटते की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली आहेत. आपल्या महापुरुषांनी देशासाठी खूप काही दिले आहे , आता देण्याची जबाबदारी आपली आहे.ती भावना आपण इथून घेऊया ... कारण आता इथून जात आहात तर आपल्याकडे थोडा अधिक वेळ असेल, सभापती जी यांचे बंधनही राहणार नाही. तुम्ही अगदी मोकळ्या मनाने मोठ्या मंचावर जाऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या अनमोल उत्सवाला माध्यम बनवून येणाऱ्या पिढ्यांना कशाप्रकारे प्रेरणा देता येईल यात जर आपले योगदान राहिले तर मला वाटते, देशाला खूप सामर्थ्य मिळेल, त्याचा मोठा लाभ मिळेल.
मी सर्व सहकाऱ्यांचा वैयक्तिक उल्लेख करत नाही आहे. सभापती जींनी म्हटले आहे की , जर तुम्ही वैयक्तिकरीत्या भेटलात तर मला सांगा, मग तर मी नक्कीच वैयक्तिकरित्या भेटण्याच्या प्रयत्न करेन, तुमच्या चांगल्या गोष्टी तुम्हा सर्वांना सांगेन. तुमच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी नक्कीच लक्षात घेतो.
पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो!
धन्यवाद !
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812144)
अभ्यागत कक्ष : 244
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam