पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

Posted On: 30 MAR 2022 9:48AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहेअसे पंतप्रधान म्हणाले.  2003 मध्ये जिनिव्हा येथून या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या अस्थी मायदेशी परत आणल्याची आठवण त्यांनी सांगितली.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या  पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करूयाप्रत्येक भारतीयाला आपल्या  स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा अभिमान वाटतो. 2003 मध्ये जिनिव्हा येथून त्यांच्या अस्थि मायदेशी  परत आणू शकलो  हा  माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक आहे ."

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1811287) अभ्यागत कक्ष : 215