पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 29 मार्च रोजी मतुआ धर्म महामेळ्याला करणार संबोधित
Posted On:
28 MAR 2022 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2022
श्री श्री हरिचंद ठाकूरजी यांच्या 211 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील श्रीधाम ठाकूर नगर, ठाकूरबारी इथे उद्या, 29 मार्च 2022 रोजी होणार असलेल्या मतुआ धर्म महामेळा 2022 ला संध्याकाळी साडेचार वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
श्री श्री हरीचंद ठाकूरजी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अखंड म्हणजेच तोपर्यंत विभाजन न झालेल्या बंगालमधील दलित, शोषित आणि वंचित लोकांच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य वेचले.
आता बांगलादेशमध्ये असलेल्या ओराकंडी येथे त्यांनी 1860 मध्ये सुरू केलेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे केंद्र आहे. या चळवळीतून मतुआ धर्माची स्थापना झाली.
ऑल इंडिया मतुआ महासंघातर्फे 29 मार्च ते 5 एप्रिल 2022 या कालावधीत मतुआ धर्म महामेळा 2022 भरवण्यात येणार आहे.
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810638)
Visitor Counter : 212
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam