आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 183 कोटी 26 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष वयोगटातील किशोरावयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 1 कोटी 23 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येत घसरण होऊन आज देशात केवळ 15,859 रुग्ण कोविड सक्रीय; ही रुग्णसंख्या भारतातील एकूण कोविड बाधितांच्या केवळ 0.04%

गेल्या 24 तासांत देशात 1,270 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.75%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.26%

Posted On: 28 MAR 2022 9:04AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने  183   कोटी  26   लाखांचा ( 1,83,26,35,673 ) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,17,89,216   सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत  1.23 लाखांहून अधिक( 1,23,75,762  ) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403486

2nd Dose

9996574

Precaution Dose

4424002

FLWs

1st Dose

18412826

2nd Dose

17502040

Precaution Dose

6799364

Age Group 12-14 years

1st Dose

12375762

Age Group 15-18 years

1st Dose

56833999

2nd Dose

37248743

Age Group 18-44 years

1st Dose

554304688

2nd Dose

463667842

Age Group 45-59 years

1st Dose

202695826

2nd Dose

184801083

Over 60 years

1st Dose

126700974

2nd Dose

115111778

Precaution Dose

11356686

Precaution Dose

2,25,80,052

Total

1,83,26,35,673

 

देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 15,859 झाली आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या  केवळ 0.04%  आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.75% आहे. गेल्या 24 तासांत  1,567 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता  4,24,83,829 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात  1,270 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,32,389  चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर  78 कोटी 73 लाखांहून अधिक ( 78,73,55,354  ) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या  0.26%   आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील 0.29%  इतका नोंदला गेला आहे.

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1810371) Visitor Counter : 200