पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक;  पीडितांना पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत जाहीर

Posted On: 27 MAR 2022 12:41PM by PIB Mumbai

 

आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे भीषण बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक  व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी,मृतांच्या निकट वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या सानुग्रह मदतीस  मंजुरी दिली आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

"आंध्रप्रदेशातील चित्तूर, येथे भीषण बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे  दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.   आशा व्यक्त करतो, की जखमी लवकर बरे होतील.

मृतांच्या  निकट वारसाला  पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी   2 लाख रुपये आणि  जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची  सानुग्रह मदत  दिली  जाईल: PM @narendramodi"

***

S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor


(Release ID: 1810209) Visitor Counter : 226