पंतप्रधान कार्यालय

भारताचे माजी सरन्यायाधीश आर.सी.लाहोटी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 24 MAR 2022 9:10AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश आर.सी.लाहोटी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“माजी सरन्यायाधीश आर.सी.लाहोटी यांच्या निधनामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेप्रती त्यांचे योगदान आणि वंचितांना जलद न्याय मिळवून देण्याची सुनिश्चिती करण्यावर त्यांनी दिलेला भर यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1809012) Visitor Counter : 209