पंतप्रधान कार्यालय
हैदराबादमध्ये भोईगुडा येथील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला; पिडीतांसाठी पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत मंजूर केली
Posted On:
23 MAR 2022 11:30AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील भोईगुडा भागातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली आहे.
आपल्या ट्विट संदेशांच्या साखळीत पंतप्रधान म्हणाले;
“हैदराबादच्या भोईगुडा भागात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांबद्दल तीव्र दुःखी झालो आहे. या दुःखद प्रसंगी पीडित कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला पीएमएनआरएफमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येईल: पंतप्रधान@narendramodi”
"హైదరాబాద్లోని భోయిగూడలో జరిగిన ఘోర అగ్నిప్రమాదంలో ప్రాణ నష్టం జరగడం బాధాకరం. ఈ దుఃఖ సమయంలో మృతుల కుటుంబాలకు నా సానుభూతి తెలియజేస్తున్నాను. PMNRF నుండి ఒక్కొక్కరికి 2 లక్షలు ఎక్స్ గ్రేషియా మరణించిన వారి కుటుంబాలకు ఇవ్వబడుతుంది: PM @narendramodi"
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808556)
Visitor Counter : 189
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam