पंतप्रधान कार्यालय
जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची शपथ घेण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
22 MAR 2022 10:33AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी पाणी बचतीसाठी काम करणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्थांचे कौतुकही केले.
ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"गेल्या काही वर्षांमध्ये, देशाच्या सर्व भागांमध्ये नाविन्यपूर्ण प्रयत्नांसह, जलसंवाद ही एक लोकचळवळ बनताना पाहणे आनंददायी आहे. मी त्या सर्व व्यक्ती आणि संस्थांचे कौतुक करू इच्छितो जे पाणी बचतीसाठी काम करत आहेत."
"अद्भिः सर्वाणि भूतानि जीवन्ति प्रभवन्ति च।।
जागतिक जल दिनानिमित्त, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याच्या आपल्या प्रतिज्ञेप्रती कटिबद्ध होऊया. जलसंवर्धन आणि आपल्या नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन सारख्या अनेक उपाययोजना आपला देश
करत आहे.”
"माता आणि भगीनींचे जीवन सुलभ बनवण्यात जल जीवन मिशन अत्यंत प्रभावी सिद्ध होत आहे. लोक भागीदारीतून घरा-घरात नळाद्वारे पाणी पोहचण्याचा संकल्प पूर्ण होईल."
"आपण सारे मिळून, जलसंधारण करूया आणि शाश्वत धरेसाठी योगदान देऊया. जतन केलेला प्रत्येक थेंब आपल्या लोकांना मदत करेल आणि प्रगती साधेल."
***
Jaydevi PS/ VG/Cy
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1808060)
आगंतुक पटल : 270
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada