पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसंदर्भात 11 वेबिनारद्वारे चर्चा आणि विचारमंथनात केले मार्गदर्शन
अर्थसंकल्पाशी संबंधित 11 वेबिनारमध्ये पंतप्रधानांचा सहभाग
या वेबिनारमध्ये 40 हजार हितधारक झाले सहभागी
केंद्र आणि राज्य सरकारांसह उद्योजक, एमएसएमई, निर्यातदार, जागतिक गुंतवणूकदार, स्टार्टअप इत्यादी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते
अर्थसंकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारला अत्यंत फलदायी माहिती आणि सूचना झाल्या प्राप्त
या वेबिनारमुळे हितधारकांमध्ये स्वामित्वाची भावना निर्माण करण्यात आणि कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात मदत
Posted On:
09 MAR 2022 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
आज, पंतप्रधानांनी डीआयपीएएम -DIPAM च्या अर्थसंकल्प संबंधित घोषणांवर चर्चा करण्यासाठी वेबिनारला संबोधित केले. पंतप्रधानांनी संबोधित केलेल्या अर्थसंकल्प संबंधी 11 वेबिनारच्या मालिकेतले हे शेवटचे भाषण होते. पंतप्रधानांनी उच्च शिक्षण, ग्रामीण विकास, कृषी, संरक्षण, आरोग्य, डीपीआयआयटी, पीएसए, एमएनआरई , डीईए आणि डीआयपीएएम मंत्रालये/विभागांशी संबंधित अर्थसंकल्पीय वेबिनारमध्ये भाग घेतला. केंद्रीय अर्थसंकल्प-2022 मध्ये देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. हे वेबिनार अर्थसंकल्पाची गती टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये सर्व हितधारकांमध्ये स्वामित्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते, या वेबिनारमध्ये स्मार्ट शेती, पीएम गतिशक्ती, संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णता , डिजिटल शिक्षण आणि वैविध्यपूर्ण कौशल्य, सर्वसमावेशक आणि न्याय्य आरोग्य सेवा वितरण, मेक इन इंडिया आणि महत्त्वाकांक्षी अर्थव्यवस्थेसाठी वित्तपुरवठा इ. विविध विषयांचा समावेश होता.
वेबिनार आयोजित करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट अर्थसंकल्पाबाबत प्रमुख हितधारकांमध्ये स्वामित्व भावना विकसित करणे हे होते. या आयोजनामुळे मंत्रालये आणि विभागांना नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच कामाला सुरुवात करण्यास आणि कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास देखील मदत होईल. विविध हितधारकांशी सल्लामसलत केल्यामुळे त्यांचे व्यावहारिक/जागतिक कौशल्य आणि अनुभव सर्वांसमोर आणण्यात आणि त्रुटी ओळखण्यास मदत झाली. अर्थसंकल्प अलिकडे म्हणजे 1 फेब्रुवारीला घोषित केल्यामुळे आणि वेबिनारमधील या परस्परसंवादामुळे राज्य सरकारांना प्राधान्यक्रमांची अधिक चांगली ओळख होते आणि त्यानुसार तरतुदींचे अधिक चांगले नियोजन करता येते.
या वेबिनारमध्ये अंदाजे 40 हजार हितधारकांचा सहभाग होता ज्यात उद्योजक, एमएसएमई, निर्यातदार, जागतिक गुंतवणूकदार, केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, स्टार्टअप्सच्या जगातील तरुण आणि इतरांचा समावेश होता. प्रत्येक वेबिनार दरम्यान सर्वसमावेशक पॅनेल चर्चा आणि संकल्पना आधारित विशेष ब्रेक-आउट सत्र आयोजित करण्यात आली होती. या वेबिनार दरम्यान सरकारला मोठ्या संख्येने मौल्यवान सूचना प्राप्त झाल्या आहेत, ज्याची अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणखी मदत होईल.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804527)
Visitor Counter : 184
Read this release in:
Urdu
,
Tamil
,
Odia
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam