आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबतची ताजी माहिती


कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारताने पार केला महत्त्वपूर्ण टप्पा

दैनंदिन नवीन कोविड रुग्णांची संख्या 662 दिवसांनंतर 4000 पेक्षा कमी

उपचाराधीन रुग्णांची संख्या 664 दिवसांनंतर 50,000 च्या खाली

Posted On: 08 MAR 2022 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मार्च 2022

 

गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन कोविड-19 रुग्णांची संख्या 3,993 वर घसरल्याने भारताने आज कोविडविरुद्धच्या लढाईत एक मोठे यश मिळवले आहे.  16 मे 2020 रोजी 3,970 रुग्णसंख्येची नोंद झाली होती. त्यानंतर 662 दिवसांनी भारतात नोंदवली गेलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

भारताने आणखी एक यश मिळवले आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या 664 दिवसांनंतर 50,000 च्या खाली आली आहे.  देशात सक्रिय सध्या 49,948 उपचाराधीन रुग्ण आहेत. 14 मे 2021 रोजी 49,219 रुग्णसंख्येची नोंद झाल्यानंतरची ही सर्वात कमी संख्या आहे.

देशातील चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढत आहे.  भारताने गेल्या आठवड्यात सरासरी 8.5 लाख  चाचण्या घेतल्या आणि साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 0.68% इतका झाला आहे.

भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड 19 महामारीविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व “संपूर्ण सरकार” या दृष्टिकोनातून करत आहे.  लसीकरण हा महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन (चाचणी, माग काढणे, उपचार आणि कोविड योग्य वर्तनासह) केन्द्र सरकारच्या पंचसूत्री धोरणाचा अविभाज्य घटक आहे.  केन्द्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने कोविड 19 चे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी आपले प्रयत्न सातत्याने वाढवत आहे.


* * *

R.Aghor/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804015) Visitor Counter : 179