महिला आणि बालविकास मंत्रालय

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी प्रदान केले ‘नारी शक्ती पुरस्कार’ – 2020 आणि 2021


महिला सक्षमीकरणाच्या दिशेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14 असे एकूण अठ्ठावीस पुरस्कार, 29 महिलांना प्रदान

Posted On: 08 MAR 2022 11:48AM by PIB Mumbai

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात ‘नारी शक्ती पुरस्कार’ - 2020 आणि 2021 प्रदान केले.  2020 आणि 2021 या वर्षांसाठी 29 उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विशेषत: मागास आणि उपेक्षित महिलांसाठी केलेल्या असाधारण कार्याचा गौरव म्हणून 29 महिलांना, अठ्ठावीस पुरस्कार - (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) - प्रदान करण्यात आले.

महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणासाठी केलेल्या अथक सेवेबद्दल आणि महिलांचा परिवर्तनकारी, सकारात्मक बदलाचे उत्प्रेरक म्हणून सन्मान करण्यासाठी महिला आणि संस्थांना महिला आणि बाल विकास मंत्रालय नारी शक्ती पुरस्कार प्रदान करते.  कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 2020 चा पुरस्कार सोहळा 2021 मध्ये होऊ शकला नाही.

 

 ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्यांच्या तपशीलासाठी येथे क्लिक करा

***

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1803858) Visitor Counter : 256