पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी नारी शक्तीला केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2022 9:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्तीला अभिवादन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"महिला दिनानिमित्त, मी आपल्या नारी शक्तीला आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीला अभिवादन करतो. केंद्र सरकार आपल्या विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करत राहील आणि सन्मान आणि संधी यावर भर देईल."
"आर्थिक समावेशनापासून ते सामाजिक सुरक्षा, दर्जेदार आरोग्यसेवा ते गृहनिर्माण, शिक्षण ते उद्योजकतेपर्यंत, आपल्या नारी शक्तीला भारताच्या विकासाच्या प्रवासात आघाडीवर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत. हे प्रयत्न आगामी काळात आणखी जोमाने सुरू राहतील."
" कच्छमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला मी आज संध्याकाळी 6 वाजता, संबोधित करेन ज्यामध्ये आपल्या समाजातील महिला संतांच्या योगदानावर प्रकाश टाकला जाईल.
संस्कृतीच्या विविध पैलूंवर, केंद्राच्या विविध कल्याणकारी उपाययोजना आणि बरेच काही यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
****
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1803806)
आगंतुक पटल : 277
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam