पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी महासागरविषयक शिखर परिषदेच्या (One Ocean Summit) उच्च स्तरीय सत्रात 11 फेब्रुवारी रोजी होणार सहभागी

Posted On: 10 FEB 2022 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास वन ओशियन समिट या महासागर शिखर परिषदेच्या उच्च स्तरीय सत्राला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

जर्मनी, युनायटेड किंगडम, दक्षिण कोरिया, जपान, कॅनडा यासह अनेक राष्ट्रप्रमुख आणि सरकारी प्रतिनिधी या शिखर परिषदेच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करतील.

संयुक्त राष्ट्र आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने फ्रान्सच्या ब्रेस्ट येथे 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान वन ओशियन समिटचे (शिखर परिषदे) आयोजन करण्यात आले आहे.

सशक्त आणि शाश्वत सागरी परिसंस्थांचे जतन आणि समर्थन करण्यासाठी ठोस कृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्रित करणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.

 

 

 

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797320) Visitor Counter : 189