अर्थ मंत्रालय

अर्थसंकल्पाने पाया घातला आहे आणि पंचाहत्तर वर्षांचा भारत ते शंभर वर्षांचा भारत या पुढील पंचवीस वर्षातील अर्थव्यवस्थेला मार्गदर्शक ठरेल


पुढील 25 वर्षांमधील आर्थिक लक्ष्य आणि तंत्रज्ञानाधारित विकास यांचा समावेश

भव्य सार्वजनिक गुंतवणूकीला पीएम गतिशक्ती मार्गदर्शक

Posted On: 01 FEB 2022 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2022

 

“आपण आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहेत म्हणजेच अमृत काळात प्रवेश केला आहे. भारताचे पदार्पण शंभराव्या वर्षात होण्यास पंचवीस वर्ष बाकी आहेत”, असे अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 संसदेत सादर करताना म्हटले. ”या अर्थसंकल्पाने पाया घातला आहे आणि पंचाहत्तर वर्षांचा भारत ते शंभर वर्षांचा भारत या पुढील पंचवीस वर्षातील अर्थव्यवस्थेला ते मार्गदर्शन करणारे आहे.”

Quote Covers_M2.jpg

 

अमृतकाळासाठी दूरदृष्टी:

मंत्रीमहोद्या  म्हणाल्या की हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि कल्याणकारी आहे. यामध्ये सूक्ष्म आर्थिक प्रगती लक्ष्यी दीर्घकालीन आर्थिक प्रगतीवर भर आहे. डिजिटल अर्थव्यवस्था व तंत्राधारित अर्थव्यवस्था, तंत्रज्ञानाधारित विकास, ऊर्जा संक्रमण, हवामानबदलासंबधी उपाययोजना  आणि येत्या पंचवीस वर्षात जी उद्दिष्टे साध्य करायची आहेत त्या क्षेत्रांसाठी खाजगी क्षेत्राकडून निधी प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक भांडवल मालमत्तेत खाजगी गुंतवणुकीची विश्वासपूर्ण पद्धत ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.

चार प्राधान्यक्रम

मंत्रीमहोदय म्हणाल्या की पीएम गति शक्ती; सर्वसमावेशक विकास; उत्पादकतेत वाढ आणि गुंतवणूक, नव्या संधी, ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदलावर उपाय योजना; तसेच गुंतवणुकपूरक वित्तपुरवठा हे या भविष्यवेधी आणि समग्र अर्थ संकल्पाचे चार प्राधान्यक्रम आहेत.


* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794325) Visitor Counter : 319