अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सैन्यदलासाठी उपयोगी उपकरणांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा अर्थसंकल्पात पुनरुच्चार


2022-23 मध्ये स्वदेशी उद्योगांसाठी 68 टक्के भांडवल संपादनाची तरतूद, जी 2021-22 मधील 58 टक्क्यांहून जास्त आहे

संरक्षण संशोधन व विकासाचे क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि स्टार्ट अप्स साठी खुले करणार

Posted On: 01 FEB 2022 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2022

 

सैन्यदलासाठी उपयोगी उपकरणांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अर्थ व कार्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केला. स्वदेशी उद्योगांसाठी या अर्थसंकल्पात 68 टक्के भांडवल संपादनाची तरतूद करण्याची घोषणा केली आहे. ही तरतूद  2021-22 मध्ये 58 टक्के होती.

संरक्षण संशोधन व विकासाचे क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि स्टार्ट अप्स साठी खुले करणार असून त्यासाठी एकूण संशोधन व विकास तरतुदीच्या 25 टक्के रक्कम  राखून ठेवली असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

सैन्यदलासाठी उपकरणे व मंचाची संरचना व विकास  करण्यासाठी खाजगी उद्योगांना प्रोत्साहित केले जाणार असून त्यासाठी त्यांनी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि इतर संस्थांशी सहकार्य करणे अपेक्षित आहे. विशेष हेतूसाठी उभारलेल्या SPV मार्फत हे सहकार्य करता येईल, असे त्या म्हणाल्या. मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या चाचणी व प्रमाणीकरणासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.


* * *

S.Tupe/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1794237) Visitor Counter : 338