अर्थ मंत्रालय
2022-23 मध्ये वित्तीय तुट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 6.4% राहील असा अंदाज
4.5% टक्यापेक्षा कमी वित्तीय तुटीचा स्तर साध्य करण्यासाठी वित्तीय एकत्रीकरणाचा प्रशस्त मार्ग जारी
2022-23 मध्ये भांडवली खर्चात 35.4% वाढ करत हा खर्च 7.50 लाख कोटी रुपये , 2021-22 मध्ये हा खर्च 5.54 लाख कोटी होता
2022-23 मध्ये भांडवली व्यय जीडीपीच्या 2.9% राहणार
2022-23 साठी सरकारची बाजारातून घेतलेली एकूण कर्जे 11, 58,719 कोटी रुपये राहण्याचा अंदाज
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2022 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022
2022-23 साठी वित्तीय तुट ही जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 6.4 टक्के राहील असा अंदाज असून, 2025-26 पर्यंत वित्तीय तुट 4.5 टक्क्यापेक्षा कमी राखण्याचे उद्दीष्ट गाठण्यासाठी गेल्या वर्षी मी जाहीर केलेल्या वित्तीय एकत्रीकरणाच्या प्रशस्त मार्गाला अनुसरून ती आहे असे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी, 2022-23 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडताना सांगितले.

चालू वर्षात सुधारित वित्तीय तुट जीडीपीच्या 6.9 टक्के राहण्याचे अनुमान आहे तर अर्थसंकल्प अनुमानात ही तुट 6.8 टक्के सादर करण्यात आली आहे.
वित्तीय तुट
2022-23 मध्ये वित्तीय तुटीचा स्तर निश्चित करताना, बळकट आणि शाश्वततेसाठी, सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे विकासाची जोपासना करण्याच्या आवश्यकतेबाबत आपण सजग असल्याचे वित्त मंत्र्यांनी सांगितले. 2022-23 साठी वित्तीय तुट 16, 61,196 कोटी राहील असा अंदाज आहे. 2021-22 साठी वित्तीय तुटीचा सुधारित अंदाज 15, 91,089 कोटी रूपयांचा आहे, तर अर्थसंकल्पीय अंदाज 15, 06,812 कोटी रुपये आहे.
भांडवली खर्च
केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्चात पुन्हा एकदा 35.4टक्के अशी मोठी वाढ करत 5.54 लाख कोटी वरून 2022-23 मध्ये 7.50 लाख कोटी करण्यात येत आहे. 2019-20 च्या तुलनेत या खर्चात 2.2 पट वाढ झाली आहे.
राज्यांना अनुदान सहाय्यतेद्वारे भांडवली मालमत्ता निर्मितीसाठीच्या तरतुदीसमवेत भांडवली खर्चासह, 2022-23मध्ये केंद्र सरकारचा प्रभावी भांडवली खर्च 10.68 लाख कोटी रुपये राहील असा अंदाज असून तो जीडीपीच्या 4.1% असल्याची माहिती वित्तमंत्र्यांनी दिली.
2022-23 मध्ये एकूण खर्च 39.45 लाख कोटी रुपये तर कर्जाव्यतिरिक्त एकूण मिळकत 22.84 लाख कोटी रुपये राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2021-22 च्या अर्थसंकल्प अंदाजात एकूण खर्च 34.83 लाख कोटी दर्शवण्यात आला होता तर सुधारित अंदाज37.70 लाख कोटी रुपयांचा असल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले.
बाजारातून उभारलेली कर्जे
2022-23 साठी सरकारची बाजारातून उभारलेली एकूण कर्जे 11,58,719 कोटी रुपये राहतील असे अनुमान आहे. 9, 67,708 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्प अंदाजाच्या तुलनेत, 2021-22 मध्ये यासाठी सुधारित अंदाज 8, 75,771कोटी रुपयांचा वर्तवण्यात आला आहे.

* * *
G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1794231)
आगंतुक पटल : 1025
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
Punjabi
,
Malayalam
,
Gujarati
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
English
,
Tamil
,
Telugu
,
Kannada