युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
आशियाई क्रीडास्पर्धेत स्क्वॉश मध्ये चांगले यश मिळविण्यासाठी मंत्रालयाने ख्रिस वॉकरच्या नियुक्तीला दिली मान्यता
Posted On:
24 JAN 2022 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2022
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने दोन वेळा जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिप पदक विजेता ख्रिस वॉकर याला या वर्षाच्या अखेरीला होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय संघाचा परदेशी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. स्क्वॉश आणि सायकलिंगमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारा वॉकर हा 16 आठवड्यांसाठी प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहील.
इंग्लंडचा माजी कर्णधार, वॉकर याच्या नियुक्तीची शिफारस भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या निवड समितीने आणि भारताच्या स्क्वॅश रॅकेट फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मार्क केर्न्ससोबत, त्याने 1997 मध्ये प्रथम जागतिक दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये जाऊन, तो अमेरिकन संघाचा राष्ट्रीय प्रशिक्षक झाला होता.
तो म्हणाला, “जागतिक दुहेरी स्पर्धा, राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई क्रीडा स्पर्धा, एवढ्या महत्त्वाच्या स्पर्धावर्षांच्या कालावधीत टीम इंडियासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अतिशय आनंदित झालो आहे . मी फेडरेशनसोबत काम करणार आहे आणि मला भारतीय स्क्वॉश संघाच्या सर्व खेळाडूंना या आगामी स्पर्धांमध्ये सर्वोत्तम स्क्वॉश खेळण्यासाठी सर्वोत्कृष्ट तयारी करण्यास मदत करायची आहे. मी खरोखरच येणाऱ्या वर्षाची वाट पाहत आहे.”
भारत या वर्षीच्या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये चांगले यश मिळवून आणण्याबाबत प्रयत्नशीलआहे. राष्ट्रकुल खेळ 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे होणार आहेत आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत.
कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये ,भारताने दुहेरी जोडीद्वारे, दीपिका पल्लीकल कार्तिक आणि ज्योत्स्ना चिनप्पा, महिला दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत सौरव घोषाल याच्याशी भागीदारी करत दोन रौप्य पदके जिंकली होती.भारताने 2018 च्या आशियाई खेळातील तीन स्पर्धांमध्ये एक रौप्य (महिला संघ) आणि चार कांस्य पदकांसह पाच पदके मिळवली होती.
भारतीय खेळाडूंची वरीष्ठतम सदस्य क्रमांकानुसार (पीसीए) जागतिक क्रमवारी:
पुरुष: सौरव घोषाल (16 वा क्रमांकावर ), रमित टंडन (50वा ), महेश माणगावकर (51वा ), विक्रम मल्होत्रा (71) आणि वेलवान सेंथिलकुमार (122).
महिला: ज्योत्स्ना चिनप्पा (10 क्रमांकावर ), तन्वी खन्ना (77), सुनयना कुरुविला (108), आकांक्षा साळुंखे (157), उर्वशी जोशी (169).
* * *
M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792165)
Visitor Counter : 223