अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 47,541 कोटी रुपयांचा कर हस्तांतरणाचा आगाऊ स्वरूपातील हप्ता राज्यांना वितरीत करण्यास दिली मान्यता


जानेवारी 2022 मध्ये राज्यांना एकूण 95,082 कोटी रुपये मिळाले

दुसरा आगाऊ हप्ता जारी झाल्यानंतर राज्यांना कर हस्तांतरणासाठी निर्धारित रकमेहून 90,082 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आला

Posted On: 20 JAN 2022 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2022

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी कर हस्तांतरणाअंतर्गत राज्यांना 47,541 कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता देण्यास आज मान्यता दिली. ही रक्कम जानेवारी 2022 या महिन्यासाठी आजच वितरीत करण्यात येणाऱ्या नियमित कर हस्तांतरण निधीसह अतिरिक्त स्वरुपात देण्यात येत आहे.

त्यामुळे, राज्यांना एकूण 95,082 कोटी रुपये किंवा त्यांना जानेवारी 2022 महिन्यात देय असलेल्या निधीच्या दुप्पट रक्कम मिळेल. जारी करण्यात आलेली राज्यनिहाय रक्कम तक्त्यात देण्यात आली आहे.

भारत सरकारने 47,541 कोटी रुपयांचा कर हस्तांतरणाचा पहिला आगाऊ हप्ता 22 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यांना वितरीत केला होता याचा येथे उल्लेख करणे योग्य ठरेल. आज जारी करण्यात येत असलेल्या दुसऱ्या आगाऊ हप्त्यानंतर, राज्यांना कर हस्तांतरणाअंतर्गत जानेवारी 2022 पर्यंत देण्यात येणार असलेल्या निर्धारित रकमेहून अतिरिक्त 90,082 कोटी रुपये मिळतील.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वस्तू आणि सेवा करातील महसुली तूट भरून काढण्यासाठी भारत सरकारतर्फे राज्य सरकारांना 1.59 लाख कोटी रुपयांचे सलग कर्ज वितरीत करण्याचे काम ऑक्टोबर 2021 महिना संपताना पूर्ण झाले आहे हे देखील लक्षात घेण्याची गरज आहे.

कोविड-19 महामारीमुळे राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर झालेले हानिकारक परिणाम सुसह्य करून त्यांना भांडवली आणि विकासविषयक व्यय करता यावा यासाठी राज्यांचे हात मजबूत करण्याप्रती भारत सरकारच्या कटिबद्धतेला अनुसरून आजचा निर्णय घेण्यात आला आहे.  

STATEMENT SHOWING STATEWISE DISTRIBUTION OF NET PROCEEDS OF UNION TAXES AND DUTIES FOR JANUARY 2022

 
 

Sl. No.

State

Regular monthly installment for Jan 2022

Advance installment in        Jan 2022

Total releases in Jan 2022

 
 
 
 

1

Andhra Pradesh

1,923.98

1,923.98

3,847.96

 

2

Arunachal Pradesh

835.29

835.29

1,670.58

 

3

Assam

1,487.08

1,487.08

2,974.16

 

4

Bihar

4,781.65

4,781.65

9,563.30

 

5

Chhattisgarh

1,619.77

1,619.77

3,239.54

 

6

Goa

183.51

183.51

367.02

 

7

Gujarat

1,653.47

1,653.47

3,306.94

 

8

Haryana

519.62

519.62

1,039.24

 

9

Himachal Pradesh

394.58

394.58

789.16

 

10

Jharkhand

1,572.17

1,572.17

3,144.34

 

11

Karnataka

1,733.81

1,733.81

3,467.62

 

12

Kerala

915.19

915.19

1,830.38

 

13

Madhya Pradesh

3,731.96

3,731.96

7,463.92

 

14

Maharashtra

3,003.15

3,003.15

6,006.30

 

15

Manipur

340.40

340.40

680.80

 

16

Meghalaya

364.64

364.64

729.28

 

17

Mizoram

237.71

237.71

475.42

 

18

Nagaland

270.51

270.51

541.02

 

19

Odisha

2,152.66

2,152.66

4,305.32

 

20

Punjab

859.08

859.08

1,718.16

 

21

Rajasthan

2,864.82

2,864.82

5,729.64

 

22

Sikkim

184.47

184.47

368.94

 

23

Tamil Nadu

1,939.19

1,939.19

3,878.38

 

24

Telangana

999.31

999.31

1,998.62

 

25

Tripura

336.66

336.66

673.32

 

26

Uttar Pradesh

8,528.33

8,528.33

17,056.66

 

27

Uttarakhand

531.51

531.51

1,063.02

 

28

West Bengal

3,576.48

3,576.48

7,152.96

 

 

TOTAL 

47,541.00

47,541.00

95,082.00

 

 

 

S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791192) Visitor Counter : 297