गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 30 कार्यक्रमांचे आयोजन करत आहे


सुरत येथे ‘स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण’ या महाअंतिम सोहळ्याची सांगता होईल

केंद्रीय मंत्री हरदीप एस पुरी यांनी ‘स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण’ संकल्पना असलेल्या सचित्र माहितीपत्रकाचे केले प्रकाशन.

सरकार आपल्या नागरिकांना राहण्यासाठी अव्वल दर्जाची जागा देण्यासाठी वचनबद्ध आहे: केंद्रीय मंत्री हरदीप एस पुरी

Posted On: 11 JAN 2022 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2022

 

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त माननीय पंतप्रधानांनी उद्घोष केलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा (एकेएएम) अंतर्गत 30 कार्यक्रमांची मालिका गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (एमओएचयूए), आयोजित करत आहे. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्च 2021 मध्ये झाले.  ऑगस्ट, 2022 मध्ये आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनासाठी 75 आठवड्यांची उलट गणना तेव्हापासून सुरु झाली. त्यानंतरही एक वर्ष म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत ती सुरू राहील.

‘स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण’ या संकल्पनेवर आधारीत सचित्र माहितीपुस्तिकेचे औपचारिक प्रकाशन आज गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस पुरी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात झाले.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, शहरी विकासाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात, सर्वसमावेशक योगदान देण्याकरता आघाडीवर राहण्यासाठी वचनबद्ध आहे असे पुरी यावेळी म्हणाले. जगण्याची क्षमता, आर्थिक क्षमता आणि शाश्वतता ही शहरी जीवनातील तीन महत्त्वाच्या आयामांचा समावेश करणारी मंत्रालयाची लोककेंद्रित रणनीती त्यांच्या सर्व प्रमुख कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत आहे असे ते म्हणाले. सरकार आपल्या नागरिकांना राहण्यासाठी अव्वल दर्जाची जागा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांचे योगदान अधिक विश्वासार्ह आहे असे पुरी म्हणाले.

माहितीपत्रकात (https://smartnet.niua.org/azadi-ka-amrit-mahotsav) 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत एमओएचयूएद्वारे संपूर्ण देशभरातील शहरांमध्ये आयोजित केलेल्या 30 प्रतिष्ठित आणि प्रभावशाली कार्यक्रमांपैकी प्रत्येकाचा सारांश आहे.  (परिशिष्ट १ मधील कार्यक्रमांची यादी)

Annexure - I

List of 30 events from January 1 and January 31, 2022

S. No.

Name of Event

Event Date(s)

1.

GIS Hackathon: An Urban Geospatial Data Stories Challenge 2022

1-17 Jan

2.

Freedom2Walk & Cycle Challenge for Citizens and City Leaders

1-26 Jan

3.

Smart Cities and Academia Towards Action and Research (SAAR)

1 Jan onwards

4.

Climate Change Awareness Campaign

1-26 Jan

5.

Vibrant Gujarat: PPP Roadshows

8 Jan*, 17-30 Jan

6.

Beyond PMAY-U- Panel Discussion

10-15 Jan

7.

Healthy Cities Consultative Workshop

12 Jan

8.

Placemaking Marathon 2.0

15-26 Jan

9.

Panel Discussion on Slum Free Cities

16-20 Jan

10.

Open Data Week (Part 1)

17-21 Jan

11.

Open Data Week (Part 2)

17-21 Jan

12.

Inauguration of Pune Metro Reach 1 and 2

17-31 Jan

13.

Urban Startup Addas for10 Cities

17-31 Jan

14.

Winter Mobilization of Urban Homeless

17-31 Jan

15.

Job Melas

17-31 Jan

16.

Loan Melas

17-31 Jan

17.

SVANidhi se Samriddhi

17-31 Jan

18.

SVANidhi Special Drive

17-31 Jan

19.

‘Swachhatam Connect’ Campaign

17-31 Jan

20.

‘Lakshya Zero Dumpsite’ Campaign

17-31 Jan

21.

Swachh Technology Challenge - Results

17-31 Jan

22.

‘Har Dhadkan Hai Swachh Bharat Ki’

17-31 Jan

23.

Workshop on Water Secure NCR

17-31 Jan

24.

One week -One Lakh connection programme

17-31 Jan

25.

PMAY-U Travelogues

17-31 Jan

26.

Restoration and Rejuvenation of River Yamuna floodplains

17-31 Jan

27.

Finance Automation under PMAY-U

21 Jan

28.

Swachhata Start-up Challenge Campaing

27 Jan

29.

Webinar on Smart Buildings

28 Jan

30.

Announcement of PMAY-U Awards: 150 Days Challenge

30 Jan

 *-postponed

'स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण' परिषदेच्या भव्य समारंभात या अंतिम सोहळ्याची सूरतमधे सांगता होईल. 4 आणि 5 फेब्रुवारी 2022 रोजी सूरतमध्ये 6 संभाव्य मुख्य कार्यक्रम आयोजित केले जातील. देशातली कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता तारखा संभाव्य आहेत. 

स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सवात पुढील पाच संकल्पना प्रतिबिंबित होतात.- स्वातंत्र्य लढा, कृती@75, उपलब्धी@75, कल्पना@75 आणि निराकरण@75.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सोहळ्यात 3 लाखांहून अधिक भारतीय नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1789149) Visitor Counter : 211