पंतप्रधान कार्यालय
शिलाँग चेंबर संगीत समूहाचे नील नॉन्गकिन्रीह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
05 JAN 2022 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलाँग चेंबर संगीत समूहाचे (कॉयर) मार्गदर्शक आणि समन्वयक नील नॉन्गकिन्रीह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
“नील नॉन्गकिन्रीह हे शिलाँग चेंबर कॉयरचे उत्कृष्ट मार्गदर्शक होते, त्यांच्या कलेने त्यांनी जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यांच्या काही उतमोत्तम सांगितिक मैफिलींचा मीही आस्वाद घेतला आहे. खूप लवकर ते आपल्याला सोडून निघून गेले. त्यांचे पियानोवादन आणि सर्जनशीलता मात्र कायम लोकांच्या स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांबद्दल मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.” अशा भावना पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमधून व्यक्त केल्या आहेत.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1787827)
आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam