पंतप्रधान कार्यालय
हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलाच्या इतर अधिकाऱ्यांच्या मृत्युबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
Posted On:
08 DEC 2021 7:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021
तमिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलाच्या इतर अधिकाऱ्यांच्या मृत्युबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या संदर्भात केलेल्या विविध ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामुळे मला अतिशय दुःख झाले आहे ज्यामध्ये आम्ही जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलाच्या इतर अधिकाऱ्यांना गमावले आहे. त्यांनी संपूर्ण समर्पित वृत्तीने देशाची सेवा केली. या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
जनरल बिपिन रावत एक असामान्य सैनिक होते. एक खरे देशभक्त होते. आपल्या सशस्त्र दलांचे आणि संरक्षण सामग्रीचे आधुनिकीकरण करण्यात त्यांनी खूप मोठे योगदान दिले. संरक्षणविषयक घडामोडींविषयींची त्यांची दूरदृष्टी आणि दृष्टीकोन असाधारण होते. त्यांच्या निधनामुळे मला तीव्र दुःख झाले आहे. ओम शांती.
भारताचे पहिले सीडीएस म्हणून जनरल रावत यांनी आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित संरक्षण सुधारणांसह विविध पैलूंवर काम केले. त्यांच्या असामान्य सेवेला देश कधीही विसरणार नाही."
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1779456)
Visitor Counter : 201
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam