ऊर्जा मंत्रालय
बीईईने उर्जा संवर्धन विषयावरील राष्ट्रीय पातळीवरच्या चित्रकला स्पर्धा 2021 चे केले आयोजन
या स्पर्धेसाठी सुमारे 200 हून अधिक ठिकाणी 45,000 हून अधिक जणांनी केली नोंदणी
राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिनी शालेय विद्यार्थ्यांना मिळणार 9 लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके
Posted On:
04 DEC 2021 3:30PM by PIB Mumbai
वर्ष 2005 पासून बीईई अर्थात उर्जा कार्यक्षमता मंडळ शालेय विद्यार्थ्यांसाठी उर्जा संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय पातळीवरच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करत आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: उर्जेच्या बाबतीती कार्यक्षम भारत’ आणि ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: अधिक स्वच्छ ग्रह’ अशा या वर्षीच्या स्पर्धेच्या संकल्पना आहेत. देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील आणि त्यानंतर 12 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन होईल. राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना 14 डिसेंबर 2021 रोजी, राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिनी होणाऱ्या कार्यक्रमात पारितोषिके दिली जातील.
केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या प्रशासनिक नियंत्रणाखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (पीएसयूज)सक्रीय पाठबळासह उर्जा कार्यक्षमता मंडळ ही स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेच्या आयोजनात सहभागी असणाऱ्या केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची यादी परिशिष्ट 1 मध्ये दिली आहे.
देशातील युवा वर्गाच्या मनात उर्जा संवर्धनाविषयी जागृती निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या चित्रकला स्पर्धेमुळे केवळ विद्यार्थीच उर्जा संवर्धनाच्या गरजेबाबत जागरूक होतील असे नव्हे तर त्याच वेळी ते त्यांच्या पालकांच्यात या बद्दल जागृती करून त्यांना देखील या उपक्रमात सहभागी करून घेतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर उर्जा संवर्धनाबाबतची सवय ठसविली जाईल आणि त्यांच्यात या संदर्भातील वागणूक बदल देखील घडून येईल.
या स्पर्धेसाठी विद्यार्थी तसेच व्यक्तींसाठी 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मंडळाच्या पोर्टलवर (www.bee-studentsawards.in) ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली होती.या चित्रकला स्पर्धेसाठी नोडल संस्थांकडे सुमारे 45,000 हून अधिक व्यक्तींनी नोंदणी केली आहे. संबंधित नोडल संस्थांनी राज्यस्तरीय चित्रकल स्पर्धेच्या आयोजनासाठी 200 हून अधिक ठीकाने निश्चित केली आहेत. स्पर्धेसाठी निश्चीत झालेली ठिकाणे आणि राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे तपशील परिशिष्ट 2 मध्ये दिले आहेत.
ही चित्रकला स्पर्धा लोकप्रिय व्हावी आणि या स्पर्धेत सर्वांचा सहभाग वाढवा या हेतूने बीईई अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे. नोडल पीएसयुज अर्थात सार्वजनिक उपक्रम (परिशिष्ट 1 मधील यादीनुसार)राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेच्या जाहिरातीसाठी एफएमरेडीओ, आकाशवाणी, व्हिडीओ फिल्म, छापील जाहिराती आणि इतर समाजमाध्यमांचे मंच वापरून जाहिरात मोहीम राबवीत आहे.
कोविड महामारीच्या परिस्थितीत, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू असलेले सर्व प्रशासकीय नियम पाळण्याचे तसेच सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, चांगल्या सॅनिटायझरचा वापर, स्पर्धेच्या ठिकाणची आणि परिसरातील स्वच्छता तसेच स्पर्धा आयोजन काळात अनेक व्यक्तींनी गटाने वावरणे किंवा एकत्र येणे यावर निर्बंध यासारख्या सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश मंडळाने नोडल संस्थांना दिले आहेत. संबंधित सार्वजनिक उपक्रमाना स्पर्धा आयोजनात लागेल ती मदत करून स्पर्धा सुरळीतपणे पार पाडायची विनंती राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय तज्ञ /परीक्षकांकडून गट अ (इयत्ता 5 वी ते 7वी) आणि गट ब (इयत्ता 8 वी ते 10 वी) अशा दोन गटांसाठी स्वतंत्रपणे स्पर्धकांनी काढलेल्या चित्रांचे परीक्षण केले जाईल. दोन्ही गटांतील पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या चित्रांची स्कॅन केलेली प्रत राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पर्धेसाठी पाठविण्यात येईल.बीईई ने निवडलेल्या कला क्षेत्रातील 8 प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असलेले राष्ट्रीय पातळीवरील परीक्षक मंडळ 12 डिसेंबर 2021ला होणाऱ्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या चित्रांचे मूल्यमापन करतील.
राष्ट्रीय पातळीवरील विजेत्यांची नवे 14 डिसेंबर 2021 रोजी जाहीर केली जातील.
राज्यस्तरीय स्पर्धेतील पारितोषिकाची रक्कम:
S.No
|
Prize for each Group ‘A’ & ‘B’
|
Amount (Rs.)
|
i
|
First
|
Rs. 50,000/-
|
ii
|
Second
|
Rs. 30,000/-
|
iii
|
Third
|
Rs. 20,000/-
|
|
|
|
iv
|
Consolation (10 nos)
|
Rs. 7,500/-
|
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील पारितोषिकाची रक्कम:
S.No
|
Prize for each Group ‘A’ & ‘B’
|
Amount (Rs.)
|
i
|
First
|
Rs. 1,00,000/-
|
ii
|
Second
|
Rs. 50,000/-
|
iii
|
Third
|
Rs. 30,000/-
|
iv
|
Consolation (10 nos)
|
Rs. 15,000/-
|
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778005)
Visitor Counter : 319