आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्र्याक़डून “ हर घर दस्तक” मोहिमेची राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील स्थिती आणि प्रगतीचा आढावा
या मोहिमेदरम्यान कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेच्या व्याप्तीमध्ये 11.7% लक्षणीय वाढ ( 30 नोव्हेंबर पर्यंत)
सरकारी किंवा खाजगी या दोन्हींपैकी कोणत्याही लसीकरण केंद्रात लस मुदतबाह्य होता कामा नये, उपलब्ध लसींचा वापर वेळेवर करावा
लसींचा अपव्यय शून्यावर आणण्याची राज्यांना सूचना
Posted On:
02 DEC 2021 4:42PM by PIB Mumbai
‘हर घर दस्तक’ या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमुळे, कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची पहिली मात्रा देण्याच्या व्याप्तीत (३० नोव्हेंबरपर्यंत) 5.9 % वाढ झाली आहे.आणि या मोहिमेदरम्यान दुसरी मात्रा देण्याच्या व्याप्तीमध्ये 11.7% इतकी लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव श्री राजेश भूषण यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून (व्हीसी ) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत “हर घर दस्तक” मोहिमेअंतर्गत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील स्थिती आणि प्रगतीचा आढावा घेतला.
सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरोघरी भेटी देऊन कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पहिलया मात्रेसाठी पात्र असलेले सर्व लाभार्थी आणि दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असलेले सर्व लाभार्थी यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे, लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि लसीकरण करणे, हे 3 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू झालेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 'हर घर दस्तक' चे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेदरम्यान सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या कामगिरीचे आणि प्राप्त केलेल्या यशाची केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रशंसा केली. लसीकरण मोहिमेमुळे लसीकरणाची गती वाढली असली तरी, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, देशात सुमारे 12 कोटी लाभार्थींना दुसरी मात्रा देणे बाकी आहे, हे अधोरेखित करण्यात आले.
खालील आलेख, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या दिलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेसंदर्भात ‘हर घर दस्तक’ मोहिमेची प्रगती दर्शवतो.
देशात देण्यात आलेल्या कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने आज 125 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी,तात्पुरत्या अहवालानुसार 79.13 कोटी (84.3%) लाभार्थ्यांचे पहिली मात्रा देऊन लसीकरण करण्यात आले आहे आणि 45.82 कोटी (49%) लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा प्राप्त झाली आहे.
राज्यांना देण्यात आलेला सल्ला
1. सर्व पात्र लाभार्थींना पहिली मात्रा देण्याची व्याप्ती पूर्ण करणे
2. लसीकरणाची गती झपाट्याने वाढवून दुसरी मात्रा देय असलेल्या सर्व लाभार्थ्यांची व्याप्ती सुनिश्चित करण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर 21 मध्ये दिलेल्या मात्रांसंदर्भात लक्ष्यित योजना तयार करा.
3. राज्यातील उपलब्ध लसीच्या मात्रांचा वेळेवर वापर होत असल्याची आणि सरकारी आणि खाजगी दोन्ही प्रकारच्या लसीकरण केंद्रांमध्ये एकही मात्रा मुदतबाह्य होणार नाही हे सुनिश्चित करणे .
4. सात राज्ये (बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल) या राज्यांमध्ये पहिली मात्रा देणे मोठ्या प्रमाणात बाकी असलेले जिल्हे निश्चित करून त्या जिल्ह्यांमध्ये झायकोव्ह- डी (ZyCoV-D) लस सुरुवातीला वापरली जाईल
5. झायकोव्ह- डी (ZyCoV-D) लस देण्यासाठीचे राष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडण्यात आलेल्या राज्यांनी फार्माजेट इंजेक्टरवर आधारित प्रशिक्षण सत्रांचे नियोजन करावे आणि लसीकरणासाठी त्याचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित लस देणारे निश्चित करावेत.
दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण भागात लसीकरण व्याप्ती वाढवण्यासंदर्भातील त्यांचे अनुभव राज्यांनी यावेळी सांगितले. .लसीची मात्रा घेण्यासाठी , विशेषत: ज्यांना दुसरी मात्रा घेण्यासाठी उशीर झाला आहे अशा लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रभावशाली आणि समुदाय नेत्यांचा योग्य प्रकारे उपयोग करावा असे आवाहन केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना केले.
***
Jaydevi PS/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1777283)
Visitor Counter : 365