पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सिडनी संवादात पंतप्रधानांचे बीजभाषण

प्रविष्टि तिथि: 17 NOV 2021 9:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 18 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता सिडनी संवादमध्ये बीजभाषण  देतील.  भारताची तंत्रज्ञान उत्क्रांती आणि क्रांती या संकल्पनेवर ते बोलतील. तत्पूर्वी  ऑस्ट्रेलियाच्या  पंतप्रधानांचे  प्रास्ताविकपर भाषण होईल.

17-19 नोव्हेंबर, 2021 दरम्यान सिडनी संवाद आयोजित केला जात आहे.  ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचा हा एक उपक्रम आहे. यात  राजकीय, उद्योग   आणि सरकार प्रमुखांना  चर्चेसाठी एकत्र आणून  नवीन कल्पना मांडल्या जातील   आणि उदयोन्मुख आणि महत्वपूर्ण  तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हाने यांची माहिती  घेतली जाईल. या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे  पंतप्रधान  स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान  शिंजो आबे यांचेही बीजभाषण  होणार आहे.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1772759) आगंतुक पटल : 233
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam