पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 16 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशाला भेट देऊन पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार


या द्रुतगती महामार्गावर सुलतानपूर येथे बांधण्यात आलेल्या 3.2 किमी लांबीच्या धावपट्टीचा वापर करून होणाऱ्या हवाई कसरती देखील पंतप्रधान बघणार

Posted On: 15 NOV 2021 11:07AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 16 नोव्हेंबर 2021 रोजी उत्तर प्रदेशाला भेट देऊन दुपारी दीड वाजता सुलतानपूर जिल्ह्यातील करवाल खेरी येथे पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत.

उद्घाटन समारंभ झाल्यानंतर पंतप्रधान सुलतानपूर जिल्ह्यात द्रुतगती मार्गावर बांधण्यात आलेल्या धावपट्टीचा वापर करून होणाऱ्या हवाई कसरती देखील बघतील. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे उड्डाण आणि उतरणे शक्य व्हावे यासाठी ही 3.2 किलोमीटर लांबीची धावपट्टी बांधण्यात आली आहे.
पूर्वांचल द्रुतगती महामार्गाची लांबी 341 किलोमीटर असून तो लखनौ जिल्ह्यात लखनौ-सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.731 वरील चौदसराय गावापासून सुरु होतो आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.31 वर उत्तर प्रदेश-बिहार सीमेच्या पूर्वेला 18 किलोमीटरवर असलेल्या हैदरीया गावापर्यंत जातो. हा द्रुतगती महामार्ग 6 पदरी असून भविष्यात त्याचे 8 पदरीकरण करता येईल. सुमारे 22,500 कोटी अंदाजित खर्च करून निर्माण करण्यात आलेला हा पूर्वांचल द्रुतगती महामार्ग उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्व भागाचा विशेषतः लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगढ, महू आणि गाझीपुर या जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल.


***


STupe/SanjanaC/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1771903) Visitor Counter : 280