पंतप्रधान कार्यालय
पहिल्या लेखापरीक्षण दिनानिमित्त 16 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार
Posted On:
15 NOV 2021 11:06AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 15 नोव्हेंबर 2021
पहिल्या लेखापरीक्षण दिनानिमित्त 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी साडे दहा वाजता, नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या कार्यालय परिसरात होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील होणार आहे.
नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संस्थेच्या ऐतिहासिक स्थापनेचे आणि या संस्थेने गेल्या काही वर्षांत प्रशासन, पारदर्शकता आणि जबाबदारी यासंदर्भात दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लेखापरीक्षण दिवस साजरा केला जातो.
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
***
STupe/SChitnis/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771880)
Visitor Counter : 285
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam