पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांची तामिळनाडूतील काही भागात झालेल्या अतिवृष्टीबाबत तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Posted On: 07 NOV 2021 9:42PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम के स्टालिन यांच्याशी तामिळनाडू राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. मदत आणि बचाव कार्यासाठी केंद्राकडून शक्य ते सर्व सहाय्य देण्याचे आश्वासन  पंतप्रधानांनी दिले.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,

"तामिळनाडूचे मुख्यमंत्री Thiru@mkstalin  यांच्याशी चर्चा झाली आणि राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीबद्दल बोलणे झाले. केंद्राकडून मदत आणि बचाव कार्यासाठी शक्यतो सर्व सहाय्य देण्याचे आश्वासन दिले. सर्वांचे कल्याण आणि संरक्षण यासाठी प्रार्थना.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1769917) Visitor Counter : 175