पंतप्रधान कार्यालय
युकेमधील ग्लासगो येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत भेट
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2021 9:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंगडम येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने इस्रायलचे पंतप्रधान श्री. नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.
उभय नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.विशेषत: उच्च-तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्य आणखी व्यापक करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली.
पुढील वर्षी भारत आणि इस्रायल यांच्यातील संपूर्ण राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 30 वर्षे पूर्ण होतील याचे स्मरण करून देत पंतप्रधानांनी बेनेट यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1769042)
आगंतुक पटल : 219
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam