पंतप्रधान कार्यालय
18 व्या भारत-आसियान शिखर परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाष्य
Posted On:
28 OCT 2021 4:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2021
महामहिम,
नमस्कार!
या वर्षीही आपल्याला पारंपारिक कौटुंबिक छायाचित्र काढता आले नाही, पण आभासी माध्यमातून आपण आसियान-भारत शिखर परिषदेची परंपरा कायम ठेवली आहे. 2021 मध्ये आसीयानचे यशस्वी अध्यक्ष झाल्याबद्दल मी ब्रुनेईचे सुलतान यांचे अभिनंदन करतो.
महामहिम,
कोविड-19 महामारीमुळे आपल्या सर्वांनाच अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण हा आव्हानात्मक काळ एक प्रकारे भारत-आसियान मैत्रीसाठी ही कसोटीचाच होता. कोविडपूर्व काळापासूनचे आपले परस्पर सहकार्य आणि परस्पर सहानुभूती हे भविष्यात आपल्या नात्याला बळ देत राहील आणि आपल्यालोकांमधील सद्भावनेचा तो आधार असेल. इतिहास साक्षीदार आहे की भारत आणि आसियान सदस्य देश यांच्यात हजारो वर्षांपासून रसरशीत संबंध आहेत. आपली सामायिक मूल्ये, परंपरा, भाषा, ग्रंथ, वास्तुकला, संस्कृती, पाककृती इत्यादींमध्येही हे दिसून येते आणि म्हणूनच, आसियान संघटनेची एकता आणि केंद्रभूतता भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिली आहे.
आसियानची ही विशेष भूमिका, आपल्या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास अर्थात "सागर" धोरणामध्ये भारताचे ॲक्ट इस्ट धोरण समाविष्ट आहे. भारताचा हिंद-प्रशांत महासागर उपक्रम आणि आसियानचे आउटलुक फॉर द इंडो-पॅसिफिक हे हिंद -प्रशांत प्रदेशात आपली सामायिक दृष्टी आणि परस्पर सहकार्याचा पाया आहेत.
महामहिम,
आपल्या भागीदारीला 2022 मधे 30 वर्षे पूर्ण होणार आहेत. भारतालाही स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण होतील. हा महत्त्वाचा टप्पा आम्ही 'आसियान-भारत मैत्री वर्ष' म्हणून साजरा करणार आहोत याचा मला खूप आनंद आहे. आगामी अध्यक्ष देश कंबोडिया आणि आमचे देश समन्वयक, सिंगापूर यांच्या सहकार्याने परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. आता मी तुमची मते ऐकण्यासाठी आतूर आहे.
खूप खूप धन्यवाद!
Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767200)
Visitor Counter : 340
Read this release in:
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Odia