आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीच्या एकूण 97.65 कोटी मात्रा देण्यात आल्या


सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.10% ; मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर

गेल्या 24 तासात देशात 14,146 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारताची सक्रीय रुग्णसंख्या (1,95,846) 220 दिवसात सर्वात कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.42 %) गेले 114 दिवस 3 % पेक्षा कमी

Posted On: 17 OCT 2021 9:57AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2021

आज सकाळी 7  वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 41,20,772  मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंध लसीच्या मात्रांच्या एकूण संख्येने 97.65 कोटी मात्रांचा (97,65,89,540) टप्पा पार केला आहे. देशभरात 96,46,485 सत्रांच्या आयोजनातून हे लसीकरण साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

 

HCWs

1st Dose

1,03,75,835

2nd Dose

90,75,869

 

FLWs

1st Dose

1,83,61,737

2nd Dose

1,55,14,198

 

Age Group 18-44 years

1st Dose

39,26,91,878

2nd Dose

11,02,63,827

 

Age Group 45-59 years

1st Dose

16,76,26,429

2nd Dose

8,58,84,392

 

Over 60 years

1st Dose

10,56,78,041

2nd Dose

6,11,17,334

Total

97,65,89,540

गेल्या 24 तासात 19,788 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीला प्रारंभ झाल्यापासून) आतापर्यंत कोविड -19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,34,19,749  झाली आहे.

परिणामी, सध्या भारतातील रोगमुक्ती दर 98.10 %  आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग 112 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासात 14,146  नव्या कोविडग्रस्त रुग्णांची नोंद झाली. दररोज नवीन रुग्णसंख्या 229  दिवसांत सर्वात कमी असल्याचे नोंदविले गेले.

सक्रीय रुग्णसंख्या 2 लाखांच्या खाली आणि सध्या 1,95,846 इतकी आहे जी 220 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. सक्रीय रुग्णसंख्या सध्या देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.57 % इतकी आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे.

गेल्या 24 तासात देशात एकूण 11,00,123  चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत सुमारे 59.09 कोटी (59,09,35,381) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.42 % असून गेले 114 दिवस हा दर 3 %  हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 1.29 % आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेले सलग 48 दिवस 3 % हून कमी आहे आणि आता गेले सलग 131 दिवस हा दर 5 % हून कमी राहिला आहे.

***

MC/SS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1764501) Visitor Counter : 218