ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वीज निर्मिती केंद्रातील वितरित न केलेल्या विजेचा वापर केवळ राज्यांनी त्यांच्या स्वतःच्या ग्राहकांच्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यास सांगण्यात आले

Posted On: 12 OCT 2021 11:09AM by PIB Mumbai

काही राज्ये त्यांच्या ग्राहकांना वीज पुरवठा करत नाहीत शिवाय भारनियमन देखील लादत आहेत हे  ऊर्जा मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.  तसेच काही राज्ये  

पॉवर एक्सचेंजला वाढीव दराने  वीज विकत आहेत.

वीज वाटपाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारकेंद्रीय वीज निर्मिती  केंद्रांमधून (सीजीएस) 15% वीज " वाटप  केलेली वीज " अंतर्गत राखून ठेवली जाते जी केंद्र सरकार गरजू  राज्यांना ग्राहकांच्या विजेची गरज पूर्ण करण्यासाठी वितरित करते.

ग्राहकांना वीज पुरवण्याची जबाबदारी वितरण कंपन्यांची आहे आणि त्यांनी प्रथम त्यांच्या  ग्राहकांना वीज पुरवली  पाहिजे, ज्यांना 24x7 वीज प्राप्त करण्याचा अधिकार आहे

म्हणूनच वितरण कंपन्यांनी पॉवर एक्सचेंजमध्ये वीज विकू नये आणि त्यांच्या स्वतःच्या ग्राहकांना वंचित  ठेवू नये.

 त्यामुळे राज्यांना विनंती करण्यात आली आहे कीराज्याच्या ग्राहकांना वीज पुरवठा  करण्यासाठी वाटप  केलेली वीज वापराअतिरिक्त वीज असल्यास  राज्यांना केंद्र   सरकारला

कळवण्याची विनंती करण्यात आली आहे जेणेकरून ही वीज इतर  गरजू  राज्यांना वितरित  करता येईल.

 जर कोणतेही राज्य त्यांच्या ग्राहकांना वीज  पुरवता पॉवर एक्सचेंजमध्ये जास्त दराने वीज  विकत आहेत असे आढळले तर अशा राज्यांची वितरित  केलेली वीज  

परत घेतली जाईल आणि इतर गरजू राज्यांना वितरित केली जाईल.

***

JaideviPS/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1763194) Visitor Counter : 334